श्री अंबिका भवानी माता की जय…..
जय मातादी,
श्री कुलस्वामिनी अंबिका भवानी मातेचा ठाऊक असलेला पूर्वेतिहास व वर्तमानकाळ-
उपलब्ध माहितीनुसार मूळ कुळ सिंधिया उर्फ शेंडे ,गोत्र गहिलम मुळगाव चितोडगड वरून मावतगड तेथून आसिदगड वरून गोपेवाडी वरून किल्ले गाळणा तेथून धाबे शेळावे वरून तामसवाडी तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे कुटुंब स्थिर झाली.
मूळ देवी दधीमती माता गोट मांगलोद जिल्हा नागोर राजस्थान व दुसरे स्थान श्री क्षेत्र वेलदा तालुका निझर जिल्हा तापी गुजरात , शिवनी व तापी नदीच्या संगमावर मंदिर आहे .
श्री क्षेत्र वेलदा नंदुरबार. पासून निझर मार्गे हे अंतर 21 किलोमीटर आहे .
श्री कुलस्वामिनी अंबिका भवानी माता हे कुलदैवत केवळ शेंडे कुळाचे असून शिरपूर येथील काही अग्रवाल कुटुंबीय देखील देवीचे भक्त आहेत.
श्री क्षेत्र वेलदा येथील जुने मंदिर कै.श्री रामकृष्ण तुळशीराम शेंडे ( गबा आण्णा ) यांनी डोक्यावर विटा,माती, पाणी आणून छोट्या मंदिराची स्थापना १९६५ साली केली. तसेच आपल्या धाकट्या सुनेला म्हणजेच कै.सौ.सुशीलाबाई जगन्नाथ शेंडे यांना सोबत घेऊन जाऊन १९६६ सालापासून महिला दर्शनाची परंपरा सुरू केली.
असेच दिवसामागून दिवस जात होते.आपल्या शेंडे कुळाचे दैवत असूनही शेंडे कुटुंबीय/ भक्त फारसे श्री क्षेत्र वेलदा येथे जात नसत.
देवी आईची अशी अवस्था पाहून कै. श्री रमेशअण्णां जगन्नाथ शेंडे धुळे हल्ली मुक्काम पुणे यांना खुप हुरहूर वाटे,ते पुष्कळ वेळा बोलून ही दाखवत की आपण एवढ्या मोठ्या घरात राहतो. मग देवी आईला देखील एक सुंदर असे मंदिर असायला हवे.
एक दिवस चमत्कारच घडला. अण्णांना देवी आई स्वप्नात येऊन म्हणाली, अरे बाळा उठ माझा जीव गुदमरतोय.असे शब्द अण्णांच्या कानावर यायचे. ही बाब घरातील त्यांचे बंधू वसंतदादा , शशीआप्पा व परिवाराशी संवाद साधून सर्वांच्या समंतीनुसर चैत्र शुध्द नवमी सन १९९० आदरणीय परमपूज्य संत श्री सखाराम महाराज, परमपूज्य श्री मुकुंद महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. आश्विन शुद्ध २ ला नवीन संगमरवरी देवीची मूर्ती आणून विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.
तथापि कालांतराने मूर्तीचा हात तुटला म्हणून पुन्हा एकदा नव्याने तत्कालीन संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. बापू सदाशिव शेंडे पारोळा. उपाध्यक्ष डॉ. सुरेश रामकृष्ण शेंडे नाशिक. श्री एकनाथ दगडू शेंडे पाचोरा. श्री विनोद भटू पारोळेकर.. श्री.शांताराम विष्णू शेंडे धुळे. श्री शशिकांत जगन्नाथ शेंडे पुणे. श्री नंदकिशोर धोंडो शेंडे धुळे. श्री. रमेश जगन्नाथ शेंडे(आण्णा) , व त्यांच्या जोडीला श्री. के.टी. तात्या श्री. दीपक देविदास शेंडे कळवण. श्री वसंत जगन्नाथ शेंडे पुणे . श्री मेघनाथ रघुनाथ शेवाळकर. श्री रमेश नारायण शेंडे कल्याण. श्री सतीश शांताराम पारोळेकर. श्री गोटू धनजी शेंडे पारोळा यांनी सर्व देवी भक्तांच्या मदतीने मिळून प्राणप्रतिष्ठा सोहळा घडवून आणला.
अखेर हा सुवर्णक्षण दि.७, ८,९ मे २०११ रोजीच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडला त्याचबरोबर कुमारिका पूजन , नवचंडीचे होम आदी .कार्यक्रम पूजाविधी विधिवत संपन्न झाली.
त्यादरम्यान १० / १२ दिवसापूर्वी मंदिर परिसरात एक नाग सातत्याने दिसायचा व गायब व्हायचा. आणि अचानक पणे प्राणप्रतिष्ठेच्या वेळी व शोभा यात्रे दरम्यान सदर नागराजाने सर्वांना दर्शन दिले. हा एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.
मागील २ वर्षांपूर्वी सदर वेलदा गावी चक्रीवादळ आले असता आपल्या कुलदेवी अंबिका भवानी मातेने हे वादळ आपल्या अंगावर घेतले. म्हणजे त्या वादळात अवकाशातून वीज वेलदा गावात कोसळली होती त्यात कोणत्याही स्वरूपात जिवित हानी होऊ दिली नाही.सदर वीज ही देवीच्या कळसावर पडून देखील काही झाले नाही. हा देखील आई भवानी मातेचा एक मोठा चमत्कारच म्हणावा लागेल.
वर्तमानात मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी देवीची आरती केली जाते. त्या ठिकाणी गावातील काही कुटुंबीय व आजूबाजू चे लोक नित्य दर्शनाला येत असतात
अलिकडच्या काळात शेंडे भक्तांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी देविआईच्या दरबारी वाढली असून ती दिवसागणिक वाढते आहे.
श्रीक्षेत्र वेलदा येथे चैत्रशुद्ध रामनवमी या काळात श्री कुलस्वामिनी अंबिका भवानी मातेचा यात्रा उत्सव असतो. तसेच शेंडे परिवारातील लोक देवीला बोन भरण्यासाठी येत असतात. नवमीला बोन भरून दशमीला लोक खातात काही परिवार दशमिलाच बोन भरतात व त्या दिवशी नैवेद्य दाखवून दशमीलाच खातात… त्याचबरोबर लहान बालकाचे शेंडी देण्याचा कार्यक्रम पण चैत्र पौर्णिमेच्या दशमीला असतो.. दशमीच्या दिवशी सत्यनारायण पूजा पण आयोजित केलेली असते.
नवरात्राच्या नऊ दिवसात मंदिरावर मोठी आरास करून उत्सव साजरा केला जातो व घट बसवले जातात त्याचबरोबर अष्टमीला होम पूजा आयोजित केलेली असते व महाप्रसाद पण असतो.
तसेच सन 2023 पासून तत्कालीन संपूर्ण संचालक मंडळ व श्री देविदास विठ्ठल शेंडे कळवण यांच्या संयुक्त विद्यमानाने त्रिपुरा पौर्णिमे चा उत्सव व छप्पन भोग असा दुहेरी कार्यक्रम करण्यात आला. यापुढे तो कार्यक्रम विभागीय बोली पद्धतीने अखंडित चालू राहील अस नियोजन आहे.
तत्कालीन संचालक मंडळाने शेंडे परिवाराची कौटुंबिक परिचय पुस्तिका तयार करून निशुल्क प्रत्येक शेंडे परिवाराला भेट दिली..
|| श्री कुलस्वामिनी अंबिका भवानी माता की जय ||
श्री अंबिका भवानी देवी माता लाडशाखीय वाणी समाजातील गहीलम गोत्री शेंडे परिवाराची आहे. शेंडे परिवार हा मूळ तामसवाडी तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील आहे.
Powered By Splendornet – Kulswamini © 2024